.आयुर्वेदिक पद्धतीने कश्याप्रकारे नितळ , सतेज आणि निरोगी त्वचा कशी राखावी….# पिंपल्स #वांग #मुरूम #अकाली सुरकुत्या #काळे डाग …यांवर अधिक सोपा नैसर्गिक उपाय — knownature.co

Dguru
4 min readDec 16, 2020

निरोगी त्वचा हि सौंदर्यासाठी आवश्यक अशी गोष्ट आहे. त्यातही चेहऱ्यावरची त्वचा सर्वाधिक नाजूक व अतिसंवेनशील असल्याने चेहऱ्याची काळजी अधिकच घ्यावी लागते.

आत्ताच्या काळात नितळ आणि स्वच्छ त्वचा ठेवण्यासाठी , आपल्याला काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.

चेहऱ्यासाठी सर्वात त्रासदायक म्हणजे तारुण्यपीटिका होय. याखेरीज डोळ्याखालील काली वर्तुळे, गालावर वांग यामुळे सौंदर्यात बाधा येते.

चेहरा खराब होऊन पिटिका , मुरूम वगैरे उटण्याची करणे.

१) शरीरातील वाढलेल्या पित्तदोषामुळे रक्तधातू बिघडतो आणि कफ व वाताच्या साह्याने पिटिका तयार होतात.

२) त्वचेवर कुठेहि उडदाप्रमाणे काळा , ना दुखणारा , ना हलणारा किंवा जास्त ना होणार, वरती उठलेला असा जो मांसांकुर दिसतो त्याला माष किंवा मस्स असे म्हणतात. तो वात दोषामुळे होतो.

त्वचेवर तिळाप्रमाणे काळ्या रंगाचे, वेदनारहित व त्वचेच्या पृष्टभागावर लागून येणारे , वाट, पित्त किंवा कफदोषामुळे जे चिन्ह तयार होते त्याला तीळ असे म्हणत्यात.

क्रोध, परिश्रम यांनी प्रकुपित झालेले वाट, पित्त, कफ बहुदा चेहऱ्यावर काळे डाग निर्मण करतात त्यांना वांग, म्हणतात.

पिटिकांपासून कसे दूर राहावे यासाठी घ्यावयाची काळजी :

१)रक्तशुद्धी

*आपल्या संपूर्ण शरीराचे तसेच चेहऱ्याचे रक्तमोक्षण करून घ्यावे. *रक्तशुद्धीद्साठी पोटात अनंत , मंजिष्ठा , वाळा ,हळद , शतावरी , प्रवाळभस्म अशी आयुर्वेदिक औषधे घ्यावीत. *रोजच्या रोज पोट साफ होण्याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी आठवड्यातून एकदा २-३ जुलाब होऊन पोट साफ होईल अशी औषधे घ्यावीत.

२) त्वचा असंवेदनशील असल्यामुळे अनैसर्गिक गोष्टींचा शक्यतो वापर टाळावा. याउलट घरगुती गोष्टी वापरल्याने सौंदर्य अबाधित राहते.

३) वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेच्या विविध रोगांना आमंत्रण मिळते, म्हणून बाहेरून आल्यावर स्वच थंड पाण्याने चेहरा धुवावा.

४) उटण्याचा वापर ;

*चेहरा उटणे लावून धुवावा , उटण्यात वापरलेल्या औषधी वनस्पतीमुळे चेहऱ्यावरील त्वचा मुलायम, आकर्षक व सतेज होते.

** उटणे तयार करण्याची पद्धत :

उटणे तयार करन्यासाठी धने, जिरे, गुलाबाच्या पाकळ्या, चंदन, मंजिष्ठा, अनंतमूळ, जेष्टमध यांचे चूर्ण करून त्यात थोडे वेखंड चूर्ण, बेसन किंवा मसुरीच्या डाळीचे पीठ टाकावे.

वरील मिश्रणात ,जर आपली त्वचा रुक्ष असल्यास कोरफडीचा गर, कफाधिक्य असल्यास गरम पाणी मिसळून आणि पित्ताधिक्या असल्यास गुलाबजल मिक्स करून उटणेहलक्या हाताने चेहऱ्यावर चोळून लावावे व नंतर कोमट पाण्याने धुवून टाकावा.

*उटण्यामुळे चेहऱ्याला होणारे फायदे :

वरील उटण्यामुळे त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते, व औषधी वनस्पतीमुळे त्वचेचे पोषण होऊन तारुण्यपिटिका, फोड, पुरळ वगैरे त्रास हळूहळू होण्यास मदत होते.

५)चेहरा मालिश

चेहऱ्यावरची छिद्रे मोकळी झाली कि त्यावर रोझ ब्युटी ऑइल सारख्यया तेलाने हलक्या हाताने मालिश करावे.

*मालिशचे फायदे.

-त्वचेचे पोषण होऊन चेहरा सतेज आणि तरुण दिसतो.
-चेहऱ्यावरच्या हलक्या तेलाच्या मालिश मुले चेहरा घट्ट होतो त्याप्रमाणे अकाली सुरकुत्या येणे बंद होते.
-तेलाने चेहरयाचा वर्ण सुधारतो ..

*मालिश कसे आणि केव्हा करावे:

-पित्ताधिक्या आणि कफादिक्या असणाऱ्या लोकांनी तेलाचा वापर दिवसातून एकदा करावा आणि वाताधिक्य असणाऱ्या लोकांनी तेलाचा वापर दिवसातून दोनदा करावा.
-हे तेल झोपण्यापूर्वी लावावे.

६) वाफ

आठड्यातून एकदा चेहऱयावर वाफारा घ्यावा. त्यासाठी पाण्यात कडुनिंबाची पाने किंवा पाव चमचा त्रिफळा चूर्ण टाकावे. याने चेहऱ्यावरील छिद्रे विस्तारित होऊन मलब्जाग पूर्णहोता निघून जाण्यास मदत होते

वाफेमुळे त्वचा मऊ आणि नितळ होते.

७)फेस पॅक किंवा मुखलेप

चंदन , केसर, प्रियंगु, जेष्टमध, पद्मकाष्ठ, मंजिष्ठा, वाला, सारिवा यासारख्या वर्ण्य वनस्पतींपासून वात , पित्त, कफाचा विचार करून तयार केलेल्या पॅक चा फायदा चांगला होतो.

मुखलेपणाचे फायदे

*अकाली सुरकुत्या , वांग , काळे डाग इत्यादी मुखरोगांचा नाश होतो. *डोळ्यांचे बल वाढते व मुख कमळाप्रमाणे सुंदर होते. *त्वचेचे विविध रोग , वर्ण विकार दूर होतात. *कोणताही विकार नसल्यास आरोग्य व सौंदर्य टिकवून ठेवतात.

तारुण्यपिटिका, काळे डाग , निस्तेजता , अकाली सुरकुत्या कमी करण्यासाठी व त्वचेचे आरोग्य टीकावूं ती होण्यासाठी करता येण्यासारखे काही उपाय :

१) चेहऱ्याला ताजा आठ ते दहा मिनिटे लावून ठेवावा.

२) कापसाच्या बोळ्यावर गुलाबपाणी घेऊन त्याने हलक्या हाताने संपूर्ण चेहरा पुसावा.

३) तारुण्यपिटिका असल्यास त्यावर सावरीच्या काट्याचे दुधात उगाळून तयार केलेले गंध लावावे.

४) पिटिकांवर जायफळ , रक्तचंदन व थोडीशी मिरी पाण्यात उगाळून तयार केलेले गंध लावाव

५) वांग असल्यास वादाचा अंकुर बारीक करून मसूरच्या पिठाबरोबर मिसळून लावावा.

६)मसूर दुधासह बारीक करून तुपासह लेप केल्यास चेहरा कमळाप्रमाणे सुंदर होतो.

७)सुरकुत्या असल्यास चेहऱ्यावर चंदन, दालचिनी, दुधाबरोबर उगाळून तयार केलेले गंध लावावे.

८)चेहरा तेलकट असल्यास दिवसातून २-३ वेळा नुसत्या कोमट पाण्याने धुवावा.

९)चेहऱ्यासाठी साबणाचा अतिवापर टाळा

अशा प्रकारे आपण चेहऱ्याची काळजी घेऊ शक्यतो …आणि आपण आपल्या सौंदर्याला टिकून ठेऊ शकतो.

Originally published at https://knownature.co on December 16, 2020.

--

--

Dguru

I am wordpress blogger and here we are going to share all ayurvedic as well as natural things information.