आपणास माहित नसलेला बहुगुणकारी शेवगा …. अवश्य वाचावी अशी शेवग्याची माहिती…# बहुगुणकारी # चक्षुष्य # वातघ्न..शेवग्याचे वृक्ष,शेवग्याचे गुणधर्म, शेवग्याचे फायदे ,शेवग्याचा उपयोग कसा करावा ?…, शेवग्याचा उपयोग कोणी करू नये? — knownature.co

Dguru
5 min readOct 28, 2020

आपल्या सर्वाना शेवग्याचे झाड माहित आहे .आणि ते सर्वत्र पाहतो. त्या शेवग्याचे खुप सारे फायदे आहेत , परंतु आपल्याला ते माहित नाही.

शेवगा हा #बहुगुणकारी # चक्षुष्य # वातघ्न आहे.सर्व फायदे आपल्याला समजावे त्यासाठी हे आर्टिकल जरूर वाचा. ह्या आर्टिकल मध्ये आपण शेवग्याचे वृक्ष,शेवग्याचे गुणधर्म,शेवग्याचे फायदे, शेवग्याचा उपयोग कसा करावा ?…, शेवग्याचा उपयोग कोणी करू नये?, शेवग्याचा आपण कोणकोणत्या प्रकारे वापर करू शकतो?ह्या गोष्टी बघणार आहोत.
शेवग्याचे आयुर्वेदिक दृष्ट्या खूप सारे फायदे आहेत, परंतु सर्वात जास्त शेवगा हा डोळ्यांसाठी खूप फादेशीर आहे..

शेवग्याचे वृक्ष

उंची-७-८ मीटर , लहान पाने असतात. शेवग्याची फुले ३ प्रकारची असतात .लाल, निळा, त्याचप्रमाणे पांढरी फुले असणारा शेवगा.. जुन्या शेंगातल्या बिया वेगळया करून त्यांचा औषधात वापर केला जातो.
शेवग्याला संस्कृत मध्ये शिगृ असे म्हणतात. त्याचे लॅटिन नाव Moringa olifera असे आहे.

शेवग्याचे गुणधर्म

१) शेवगा चवीला मधुर, कडू, असतो . त्याचप्रमाणे उष्ण गुणांचा असतो.
२) शेवगा तीक्ष्ण , लघु, सर, गुणांचा असतो.
३) शेवगा कफ व वात दोषांचे शमन करतो, परंतु पित्त दोष वाढवतो. परंतु योग्य प्रमाणात शेवगा घेतल्यामुळे अग्निदीपणाचे कार्य करतो.
शेवगा तोंडाला चव आणतो, त्याचप्रमाणे पोट साफ होण्यास मदत करते., आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेवगा डोळ्यांसाठी उपयुक्त आहे. सूज वगैरे असल्यास शेवगा उपयुगी येतो.

शेवग्याचे फायदे

शेवग्याचा उपयोग कसा करावा ?

१) शेवग्याची पाने सूज कमी करण्यासाठी उपयोगी असतात. त्यामुळे वात किंवया कफ दोषांमुळे सांधे दुखू लागतात, त्यावेळेस उकडलेल्या शेवग्याच्या पानाचा किंवा सालीच्या बारीक चूर्णाचा लेप करून लावावा.
२) गळू असेल तर शेवग्याची साल लावली असतात, ती विरघळून जाते किंवा पिकून पडून जाते.
३) शेवग्याच्या बियांचे तेल वेदना आणि सूज कमी करण्यासाठी वापरले जाते. ते तेल संधिवात , आमवात असल्यास वरून त्या तेलाने मालिश केल्याने त्वरित आराम मिळतो.
४)जर आपले डोके दुखत असल्यास शेवग्याची साल बांधल्यास तिचा उपयोग होतो.

५)शेवग्याचा मुख्य उपयोग पचनसंस्थेवर होत असल्यामुळे ,
लहान मुलांमध्ये भुकेचे प्रमाण कमी असल्यासआपण शेवग्याची भाजी करून दिल्यास , भूक लागण्यास मात होते.
त्याचप्रमाणे पोटात दुखत असल्यास त्वरित वाताचे शमन होऊन , आराम मिळतो.
६)पोटामध्ये जंत झाल्यास, आठवड्यातून २-३ वेळा शेवग्याची भाजी खाल्यास, जंत होत नाहीत.
७) अंगात ताप मुरला असेल तर, शेवग्याची भाजी दिल्यास त्वरित आराम मिळतो. ( शेवग्याच्या दीपन , पाचन गुणामुळे .. आमचे पचन होऊन ताप निवडण्यास मदत होते.)
८) काही लोकांच्या अंगावर चरबीच्या गाठी असतात , अश्यावेळेस शेवग्यचा पानांचा रस किंवा शेवग्याची बी गोमूत्रात घोटून बनवलेला लेप लावल्यास त्या गाठी विरघळण्यास मदत होते. (शेवग्याचा तीक्ष्ण गुणामुळे).
९)जर आपल्याला हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास होत असेल तर, शेवग्याच्या सालीच्या काढ्यात भिजवलेल्या कापडाने सांधे शेकल्यास , सांधेदुखी कमी होते.

१०) दमा असणाऱ्या व्यक्तींनी शेवग्याची भाजी अवश्य खावी. त्यामुळे दमा कमी करण्यास मदत होते..
११) त्याचप्रमाणे शेवग्याची भाजी कफ़ असल्यास खावी.
१२) शेवगा उष्ण गुणधर्माचा सल्यामुळे ज्या स्त्रियांना पाली वेळेवर येत नाही किंवा येताच नाही अश्या स्त्रियांनी सुद्धा हि भाजी खावी, त्यामुळे पाली येऊन , वेळेवर येण्यास मदत होते.
१३) वाढलेला कोलेस्टेरॉल कमी, करण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचा उपयोग होतो.
१४) जर आपणास तोंडामध्ये चिकटपणा जाणवत असेल , जीभ जड होत असेल, तोंडाला वारंवार पाणी सुटत असेल,किंवा लाल अतिप्रमाणात चिकट होत असेल तर, खालील उपाय करावा ..
शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून पाण्यात उकडावे . तुकडे मऊ झाल्यावर , हाताने कुस्कुरून कापडातून गाळून घ्यावेत . आणि या पाण्याच्या गुळण्या कराव्यात .
त्यामुळे वरील सर्व तक्रारीं पासून आराम मिळेल.

संधिवात, आमवात, अर्धांगवायू, स्कीअतिका वगैरे त्रास असल्यास ..त्याचप्रमाणे वेग-वेगळ्या वात विकारांमध्ये शेवग्याच्या शेंगाच्या वापर नक्की करा

शेवग्याचा उपयोग कोणी करू नये?

१) पित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी.
२) शुक्रधातू क्षिण असणाऱ्या व्यक्तींनी.
३) तब्बेतीने किरकोळ असणाऱ्या व्यक्तींनी.
अशा व्यक्तीनी शेवग्याचा अतिप्रमाणात उपयोग करू नये.. नाहीतर दोष अधिक वाढण्याची श्यक्यता असते.

त्यामुळे बहुगुणांकरी शेवग्याचा आपण सर्वानी जेवणात आवश्यक समावेश करावा. त्यामुळे आपणास निरोगी राहण्यास मदत होते. आणि त्याच निमित्ताने आपणास निसर्गाच्या सानिध्यात येतो.

शेवग्याचा आपण कोणकोणत्या प्रकारे वापर करू शकतो?

१) बाजारामध्ये शेवग्याच्या पानाची पावडर मिळते , आपण तिचा नियमित १-२ चमचे कोमट पाण्यातून वापर करू शकतो.
२)त्याचप्रमाणे शेवग्याच्या शेंगा मिळतात, आपण त्याची देखील भाजी करू शकतोय, हा पर्याय अधिक गुणकारी आहे, परंतु आपल्याला भाजी उपलब्ध नसेल तर दररोज सकाळ- संध्याकाळ , पावडर घेऊ शकतो.
३)त्याचप्रमाणे मसाज करायची हवी असल्यास, बाजारामध्ये शेवग्याच्या बियांचे तेल मिळते .. ते आपण वापरू शकतो.

आपल्या रोजच्या आहारात शेवग्याचा वापर करावा., आणि निरोगी जीवन जगा.

आपलयाला अशा कोणत्याही पदार्थांविषयी किंवा गोष्टीविषयी माहिती हवी असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

Originally published at https://knownature.co on October 28, 2020.

--

--

Dguru

I am wordpress blogger and here we are going to share all ayurvedic as well as natural things information.